IGNOU B.ED प्रवेश पात्रता परीक्षा - 2022
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली ( IGNOU ) यांच्यामार्फत सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (ENTRANCE TEST) घेण्यात येत असून त्यासाठी फॉर्म मागविले जात आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असून आपण बी.एड. हिंदी किंवा इंग्रजी या दोन भाषेमध्ये करू शकतो.
NCTE द्वारे मान्यताप्राप्त IGNOU बी.एड. (बॅचलर ऑफ एज्युकेशन) प्रवेश पात्रता परीक्षा (सन-2022) संदर्भात प्रवेशासाठी अभ्यासक्रम, ई- प्रॉस्पेक्टस आणि अर्ज हि संपूर्ण माहिती डाउनलोड करण्यासाठी खालील Click Here या बटनाला स्पर्श करा..!!
1. विद्यापीठाविषयी 3
2. विद्यापीठ नियम 10
3. स्कूल ऑफ एज्युकेशन 20
4. बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) कार्यक्रम 21
5. प्रादेशिक केंद्रांचे पत्ते आणि संहिता 51
6. परिशिष्ट 63
7. अर्ज फॉर्म भरण्यासाठी सूचना 79
8. अर्ज फॉर्म 80
परीक्षा कोण देऊ शकतो ?
1) नियमित कार्यरत शिक्षक.
2) 3 वर्षे सलग सेवा असावी.
3)) D.ED पूर्ण अनिवार्य.
4) पदवी किमान 50% गुणांनी उत्तीर्ण
(शाखा - कला, वाणिज्य किंवा विज्ञान)
B.ED प्रवेश परीक्षा स्वरूप :
एकूण गुण - 100
प्रश्न प्रकार - वस्तुनिष्ठ
भाषा - हिंदी किंवा इंग्रजी
वेळ - 2 तास (120 मी.)
परीक्षा शुल्क (Fee) :
१) एकूण परीक्षा शुल्क 600 रु आहे.
२) फॉर्म भरतांना शुल्क भरणे अनिवार्य.
३) शुल्क शिवाय परीक्षा देता येणार नाही.
ऑनलाइन फॉर्म कसा भरावा ?
1) IGNOU बी.एड. प्रवेश पात्रता परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील Click Here बटनाला स्पर्श करा.
3) त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर User ID व Password प्राप्त होईल.
4) नंतर लॉगिन स्क्रीनवर दिलेल्या Login बटणावर क्लिक करून तुमचा User ID व Password टाकून लॉग इन करा.
5) वैयक्तिक तपशील, कार्यक्रम तपशील, पात्रता तपशील आणि पत्रव्यवहार तपशील भरा.
6) खाली दिलेल्या वैशिष्ट्यांसह स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा :
* स्कॅन केलेला फोटो (100 KB पेक्षा कमी)
* स्कॅन केलेली स्वाक्षरी (50 KB पेक्षा कमी)
7) तुमची अर्ज फी डेबिट/ क्रेडिट कार्ड (मास्टर/ व्हिसा/ रुपे) किंवा नेट बँकिंगद्वारे भरा:
* डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट (मास्टर/व्हिसा/रुपे) -
तुम्हाला अर्ज फी भरण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा लागेल आणि फी भरण्यासाठी ऑनलाइन सूचनांचे पालन करावे लागेल. यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुम्ही पेमेंट कन्फर्मेशन स्लिप प्रिंट/सेव्ह करू शकाल.
* नेट बँकिंगद्वारे पेमेंट -
जर तुमचे नेट बँकिंग खाते असेल तर हा पर्याय निवडा. तुम्हाला तुमच्या बँकेच्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल.
8) एकदा तुम्ही तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर, आणि "पुढील" बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला फॉर्म पूर्वावलोकन पर्याय मिळेल. भविष्यातील संदर्भासाठी तुमचा फॉर्म जतन करा/ मुद्रित करा.
ADDRESS -
SCHOOL OF EDUCATION
INDIRA GANDHI NATIONAL OPEN UNIVERSITY
MAIDAN GARHI, NEW DELHI-110068



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा